बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुहेल शर्मा या धाडसी अधिकार्याने २0 मे रोजी माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करीत ह्यएव्हरेस्टवीरह्ण होण्याचा सन्मान मिळविला. यानंतर त्यांनी परतीचा मार्ग धरला असून, ते रविवारी रात्री उशिरा अँडव्हान्स बेस कॅम्पवर पोहोचले.२0१२ च्या भारतीय पोलीस प्रशासनिक सेवेच्या तुकडीचे अधिकारी असलेले सुहेल शर्मा यांनी ८ एप्रिल २0१६ रोजी एव्हरेस्ट सर करण्याच्या ध्येयाने आठ जणांच्या चमूसोबत एव्हरेस्टकडे कूच केली व विविध टप्प्यांनंतर २0 मेच्या पहाटे ७.४५ वाजता चमूसमवेत एव्हरेस्ट शिखर सर केले. याची समुद्रसपाटीपासून उंची ८ हजार ८४८ मीटर आहे. यानंतर त्यांच्या चमूने परतीचा मार्ग धरला. रविवारी त्यांची चमू ही अडॅव्हान्स बेस कॅम्पवर पोहोचली. चमूतील सर्व सदस्य सुखरूप असून, शर्मा यांनी भारतीय ध्वजासह महाराष्ट्र पोलिसांचाही ध्वज एव्हरेल्टवर फडकविला, हे विशेष. शर्मा यांच्या विक्रमामुळे बुलडाणा पोलीस दलामध्ये आंनद व्यक्त केला जात असून त्यांच्या परतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
एव्हरेस्टवीर सुहेल शर्मा पोहोचले ‘बेस कॅम्प’वर!
By admin | Published: May 24, 2016 1:42 AM