शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाईव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 10:36 AM

State Transport : बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टिमव्दारे बसवर नियंत्रण राहणार आहे.

अकोला : एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला आहे. एसटी गाड्यांमध्ये महामंडळाने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. डेपो, बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टिमव्दारे बसवर नियंत्रण राहणार आहे. गाडीचा वेग, लोकेशन आणि थांबा या सिस्टिमद्वारे कळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लगेच वाॅर्निंग बेल येते. सिस्टिममधल्या या फायद्याच्या बाबींमुळे वाहन-चालकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. मागील काही दिवसांपासून या प्रणालीचे काम सुरू आहे. याकरिता प्रत्येक बसस्थानकात एलईडी स्क्रिन बसविण्यात आले आहे.

गाडीची स्पीड आणि लोकेशनही कळणार!

अकोला बसस्थानकामध्ये चार मोठे डिजिटल स्क्रिन लावले आहे. यावर प्रवाशांना लाईव्ह लोकेशन दिसणार आहे.

गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे टळणार आहे. यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील.

गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहिती या सिस्टिममुळे कळते.

 

बसस्थानकात लागले चार मोठे स्क्रिन

व्हीटीएसचे शहरातील बसस्थानकात ४ मोठे स्क्रिन लागले असून प्रवाशांना येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची माहिती मिळत आहे.

थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टिममुळे स्क्रिनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वॉर्निंग बेलही दिली जाते.

रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टिममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टिमचे राहते.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळणार आहे.

आगार व्यवस्थापकाकडे त्याचा खुलासा चालक-वाहकाला करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.

प्रवाशांनाही आता गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टिमव्दारे कळणार आहे.

 

विभागातील ३६५ बसेसना व्हीटीएस

व्हीटीएस सिस्टिममुळे बसस्थानकात किती वेळात गाडी येऊ शकते, याचा अंदाज बांधता येणार आहे. अकोला विभागातील ३६५ बसेसमध्ये ही सिस्टिम बसविण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अकोला बसस्थानकात ही सिस्टीम कार्यान्वित झालेली नाही.

टॅग्स :Akola Bus Standअकोला बस स्थानकstate transportएसटी