२९ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने आयोजित आभासी प्रशिक्षणामध्ये सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सध्या जिल्हाभर गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान २२ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व गावांचा गाव कृती आराखडा तयार करून १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये या आराखड्यांना मान्यता घ्यायची आहे. त्या अनुषंगाने गाव स्तरावरील कर्मचारी पदाधिकारी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षण जिल्हास्तरावरून आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजीव फडके, गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस, उपविभागीय अभियंता कांचन उमाळे, विस्तार अधिकारी नाना पजई, विजय कीर्तने आदी आभासी पद्धतीने उपस्थित होते.
कृती आराखड्याबाबत मार्गदर्शन
जल जीवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवात असताना गाव कृती आराखड्यामध्ये गावपातळीवरील नियोजन प्रक्रिया, संकल्पना, महत्त्व विविध उपक्रमांचे प्रपत्र व कोबो कलेक्ट टोलच्या माध्यमातून संकलित करावयाची माहिती याबाबत प्रशिक्षणार्थींना उपविभागीय अभियंता कांचन उमाळे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राजेश डहाके, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रवीण पाचपोर आदींनी प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गट समन्वयक देवानंद वजिरे, तालुका व्यवस्थापक सोहेल चाऊस यांनी केले.