अकोला : सिकलसेल हा जनुकीय दोषांमुळे होणार आजार आहे. या आजाराने पिडीतांना वारंवार रक्त द्यावे लागते. हा आजार टाळण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करणे गरजेचे आहे, असे प्रतीपादन जिल्हा शल्य चिकित्सक तथा प्रभारी उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ डॉ. राजकुमार चव्हान यांनी येथे केले. जागतिक सिकलसेल दिनानिमित्त जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मंगळवार १९ जून रोजी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी मंचावर वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, सिकलसेल नोडल अधिकारी डॉ. नारायण साधवानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राधा जोगी, मेट्रन घुले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांनी सिकलसेन अजाराविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रभात फेरीला डॉ. चव्हाण व डॉ. शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही प्रभात फेरी जठारपेठ, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चौक अशी मार्गक्रमणा करीत परत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आली. संचालन सचीन पाटेकर, तर आभार प्रदर्शन डॉ. मेघना बगडीया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिकलसेल समन्वयक फाळके, समुपदेशक सचिन पाटेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता कुशवाह, परिचारिक प्रशिक्षण केंद्राचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले.