जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांमधून सेवेची बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू केली जाते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून प्राप्त झालेल्या ४७५ प्राथमिक शिक्षकांच्या प्रस्तावांची तपासणी करण्याचे काम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गत जूनपासून सुरु करण्यात आले आहे. नऊ महिने उलटून गेले; मात्र प्रस्तावांमधील त्रुटींची दुरुस्ती आणि तपासणीचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रस्ताव तपासणीचे रेंगाळलेले काम पूर्ण केव्हा होणार आणि जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांमधील त्रुटीची दुरुस्ती व तपासणीचे काम सुरु आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून, पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
वैशाली ठग
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.