‘ग्रामीण भागात बस सेवा सुरू करा !’
मुंडगाव : ग्रामीण भागात अनेक गावातील महामंडळाची बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शेगाव, अकोट, अकोलाकडे येण्यासाठी खासगी वाहनात जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधितांनी दखल घेऊन बसफेरी सुरू करण्याची मागणी होत आहे.
.............
भाजपा महिला आघाडीची आढावा बैठक
अकोटः आकोट शहर व ग्रामीणची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अश्विनी जिचकार, प्रदेश उपाध्यक्ष नयना मनतकार, प्रदेश सचिव सुरेखा लुंगारे, प्रदेश सदस्य भारती पुंडकर, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर,महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कुसुमभगत, जि.प. सदस्य कोमल पेठे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सिंधू गडम यांची उपस्थिती हाेती.
.............
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
पातूर : माहे जानेवारीचे सेवानिवृत्त वेतन मिळावे, जानेवारी २०१९ ते जून २०१९ या कालावधीतील ३ टक्के महागाई भत्ता रक्कम मिळावी, ७ व्या वेतन आयोगाची फरकाची दोन टप्पे नगदी स्वरूपात मिळावी, अशी मागणी पातूर नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. मागण्यांचे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. २८ फेब्रुवारीपर्यंत मागण्या मंजूर केल्या नाहीत तर १ मार्चपासून नगरपरिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला.