तेल्हारा : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय तळेगाव बाजार येथे अंत्यविधीसाठी खड्डा करण्यासाठी गेलेल्या तीन मजुरांनी ९ एप्रिल रोजी अनुभवला. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शहादेव राकृष्ण बोदळे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कारासाठी गावातील विलास बोदळे, ज्ञानदेव हिवराळे, सुनील बोदळे या तिघांना स्मशानभूमीत खड्डा करण्यासाठी पाठविले. सकाळपासून खड्डा खोदत असताना अचानकपणे वरील मातीची दरड कोसळून पडल्याने त्यामध्ये तीनही मजूर दबले. ही बाब उपस्थितांच्या लक्षात येताच तेथील नागरिकांनी त्वरित त्यांना बाहेर काढले. त्या ठिकाणी मयतामागील लोक उशिरा आले असते, तर तिघांचेही प्राण गेले असते. दरम्यान, पुन्हा नागरिकांनी खड्ड्यात पडलेली माती काढून त्यानंतर शहादेव बोदळे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रकाराची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली.
खड्डा खोदताना दरड कोसळली!
By admin | Published: April 10, 2017 12:52 AM