अकोला: पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे. यामध्ये जिल्ह्यात सेवा बजावलेल्या दोन पोलीस अधिकारी व व सध्या कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर यांनी काही काळ अकोला पोलीस दलात कार्यरत होते. सध्या कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अवताडे यांना राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. यासोबतच पातूर येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश सुरेश नावकर यांना नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कार्याबद्दल पदक जाहीर झाले आहे.जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवा पदक तर एकाला नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कार्याबद्दल पदक जाहीर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदक, शौर्य पदक, विशिष्ट सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदकांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील चार पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू अवताडे यांना राष्ट्रवती गुणवत्ता सेवा पदक तर नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक गणेश सुरेश नावकर यांना सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.