शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी निघाली अंत्ययात्रा

By admin | Published: October 13, 2016 2:12 AM

पत्नीच्या तेरवीला पतीचे निधन झाल्याचर घटना खामगाव येथे बुधवारी घडली.

खामगाव, दि. १२- पत्नीच्या विरहाचे दु:ख सहन न झाल्याने पत्नीच्या तेरवीच्या दिवशीच पतीचेही निधन झाले. ही घटना खामगावात बुधवारी घडली. पती-पत्नीची सात जन्माची गाठ या घटनेमुळे कायम राहिली, असा सूर नातेवाइकांमधून निघाला.स्थानिक चांदमारी भागात रहिवाशी असलेले वसंतराव यशवंतराव आखरे यांच्या पत्नी सिंधूबाई वसंतराव आखरे वय ६९ यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ११ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता. त्यानिमित्ताने सर्व तयारी करण्यात आली होती. परंतु सकाळी ६ वाजताच्या सुमारास वसंतराव आखरे वय ८२ यांची प्रकृती बिघडली व यामध्ये त्यांचे निधन झाले. वसंतराव आखरे यांच्या निधनाने त्यांच्या नातेवाइकांना धक्काच बसला. आईच्या तेरवीच्या दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करावे लागले आहे. मृत वसंतराव आखरे व सिंधूबाई आखरे दोघेही पदवीधर होते. वसंतराव आखरे यांनी कबड्डी खेळात १९५९ ला विद्यापीठ स्तरावर कलरकोट मिळविला होता, तर सिंधूबाई यांनी बॅडमिंटन स्पर्धेत १९६५ ला कलरकोट मिळविला होता. वसंतराव आखरे यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यामुळे निधनानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.