सभेला उपस्थित भगवान रविदास कम्युनिटिज फेडरेशनचे पदाधिकारी़.
अकाेला : सुधीर कॉलनी चौकात भगवान रविदास कम्युनिटिज फेडरेशन अकोला जिल्हा व अकोला शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी भीमराव अंबाडकर होते.
मान्यवरांचे स्वागत सूर्यप्रकाश चंदन यांनी केले. विदर्भ विभागीय अध्यक्ष मधुकर वानेडकर यांनी संघटनेच्या भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी भगवान रविदास कम्युनिटिज फेडरेशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली़ जिल्हाध्यक्षपदी एम. एम. ठोसरे, उपाध्यक्षपदी सारंगधर डाखोडे, तर महासचिवपदी गजानन काकडे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत सचिव विजय भटकर, कोषाध्यक्ष विष्णू वाडेकर, शहराध्यक्ष निरंजन गव्हाळे, उपाध्यक्ष श्रीराम राखोंडे, महासचिव अरुण खिरोडकर, सचिव महादेव इंगळे, अकोला-जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ- लक्ष्मणराव पदमने, उपाध्यक्ष- काशिराम उंबरकर, सचिव- विश्वनाथ ठोंबरे यांचा समावेश आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत किशोर राजगुरू यांनी केले. सभेला शेषराव गव्हाळे, नरहरी राजगुरू, ओंकार चिमणकर, मनोहर टाले, रामराव डामरे, एकनाथ चिम, किसनराव पदमने, गजानन वाडेकर उपस्थित हाेते. सूत्रसंचालन रामभाऊ ताजने यांनी केले. आभार गजानन काकडे यांनी मानले.