संतोष येलकरअकोला: काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी रविवारी घोषित केली असून, या जम्बो कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस , कोषाध्यक्ष, चिटणीसांसह २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १७ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) विस्तारित कार्यकारिणीला मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष कोषाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सहचिटणीस, प्रसिद्धी प्रमुख इत्यादी पदांवर २६६ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायम निमंत्रित सदस्यांचाही समावेश आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश करुन जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याचे दिसत आहे.विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत अशी आहे पदाधिकाऱ्यांची संख्या !पदाधिकारी संख्यावरिष्ठ उपाध्यक्ष ०२कोषाध्यक्ष ०१उपाध्यक्ष २९सरचिटणीस ७०चिटणीस ८२सहचिटणीस ८१प्रसिद्धी प्रमुख ०१
काँग्रेसची विस्तारित जिल्हा जम्बो कार्यकारिणी घोषित ! उपाध्यक्ष, सरचिटणीसांसह २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश
By संतोष येलकर | Published: November 19, 2023 11:44 PM