राजरत्न सिरसाट/अकोलावर्षभर केलेल्या संशोधनाच्या श्रमावर मान्यतेची मोहोर उमटावी यासाठी प्रतीक्षा करणार्या काही कृषी शास्त्रज्ञांच्या पदरी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत निराशा पडली. तज्ज्ञांच्या कसोटीत अनुत्तीर्ण झालेल्या काही संशोधित पिकांच्या जाती यावर्षी फेटाळण्यात आल्या, तर राहुरीच्या कापूस जातीला फेटाळूनही अंतिम क्षणी मान्यता दिल्याने तज्ज्ञ समितीच्या अहवालावरच हकनाक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक २८ ते ३0 मे असे तीन दिवस पार पडली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेले संशोधन या समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन शेतकर्यांच्या आर्थिक, सामाजिक जीवनात परिवर्तन घडविणारे असावे, यादृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्न असतात. अशा काही पिकांच्या जातींना या समितीने शेतावर पेरणीसाठी मान्यता दिली आहे; परंतु राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ह्यफुले श्वेतांबरीह्ण हे कापसाचे वाण तज्ज्ञांच्या कसोटीत खरे उतरले नसल्याने या वाणाचे प्रसारण यावर्षी थांबविण्यात आले. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत मात्र सर्व तज्ज्ञ गटांच्या समोर सभागृहात या कापसाला मान्यता देण्यात आली. संशोधन समिती बैठकीच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडल्याने या समितीतील तज्ज्ञांच्या अहवालावर प्रश्न निर्माण झाले आहेत. यासोबतच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीनच्या वाणाबाबतही प्रकार घडला आहे.तज्ज्ञांचा अहवाल फुले श्वेतांबरी कापूस हे ओलितात येणारे वाण असून,आखूड धाग्याचे आहे. सध्या सर्वत्र लांब धाग्याच्या कापसाचे प्रचलन आहे. अधिक उत्पादन व दर मिळावा, यासाठी शेतकरी लांब धाग्याच्या कापसाला प्राधान्य देतो. फुले श्वेतांबरीमध्ये आवश्यक गुणवत्ता नसल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ समितीने दिला आहे. कोणतीही नवीन जात विकसित करताना, त्या जातीचे उत्पादन १५ ते २0 टक्के अधिक असावे लागते. तथापि, हे गुणदेखील फुले श्वेतांबरीमध्ये नसल्याचे समितीपुढे आले आहे.हेक्टरी २१ क्विंटलच उत्पादनमान्यता देण्यात आलेल्या फुले श्वेतांबरी कापूस जातीचे उत्पादन हेक्टरी २१ क्विंटल आहे. शेतकरी तसेही एकरी आठ ते दहा क्विंटल कापूस पिकवतो; मग या जातीचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण करू न, अनेक सूक्ष्म बाजू तपासून या जातीची शिफारस फेटाळण्यात आली असल्याचे समितीतील तज्ज्ञांनी सभागृहात बाजू मांडली. तथापि, समितीला न जुमानता मान्यता देण्यात आली.
तज्ज्ञ समितीने फेटाळलेल्या कापूस संशोधनाची केली शिफारस!
By admin | Published: June 01, 2016 1:12 AM