अकोला : एका २१ वर्षीय महिला खेळाडूचा बॅडमिंटनचे प्रशिक्षण देणाऱ्या राहुल सरकटे याने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. सिव्हील लाईन पोलिसांनी प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.न्यायालयाने सरकटे यास १६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. चार वर्षांपासून युवतीचे लैंगिक शोषण सुरू होते. सिव्हिल लाइन परिसरात आयएमएच्या सभागृहामध्ये नराधम राहुल सरकटे याने काही वर्षांपूर्वी बॅडमिंटनचा प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता. पीडित युवती ही पूर्वी आॅफिसर क्लबमध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घ्यायची. तेथे सरकटे याच्याबरोबर तिची ओळख झाली. त्यानंतर सरकटे याने आयएमए सभागृहात प्रशिक्षण वर्ग सुरू केले. तेथे सरकटे पीडित युवतीसोबत लगट करायचा, तिला धमकावायचा. आॅक्टोबर २0१३ मध्ये त्याने बळजबरीने युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवले.आयएमएच्या सभागृहातच प्रशिक्षण वर्ग सुटल्यावर तो युवतीचे लैंगिक शोषण करायचा. त्याने पीडित युवतीचे लैंगिक शोषण करतानाचे फोटो व अश्लील चित्रफितीसुद्धा तयार केल्या. त्याने आणखी काही मुलींचे शोषण केले असण्याच्या शक्यतेने पोलीस तपास करत आहेत.
बॅडमिंटन प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूचे शोषण, अकोल्यातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 3:53 AM