अकोला : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर आणलेल्या बंदी बाबत शेतकऱ्यांच्या भावना सरकार पर्यंत पोहचल्या आहेत. या संदर्भात केंद्र सरकार लवकरच कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याबाबत निर्णय घेईल अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कांद्यावरिल निर्यात बंदी नंतर महाराष्टÑातील अनेक नेत्यांनीही केंद्र सरकारला आपली भूमिका कळविली आहे. बंदी आल्यामुळे अनेकांनी केलेले व्यवहार थांबले असतील याची जाणीव सरकारला आहे त्यामुळे या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकºयांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा नवीन कृषी कायदा अमलात आणला. शेतकºयांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्यामुळे हा नवीन कायदा शेतकºयांच्या हितासाठी ऐतिहासिक ठरणार आहे, विरोधक मात्र केवळ राजकारण म्हणून विरोध करत असल्याचे त्यांनी सांगीतले. नवीन कृषी कायदा अस्तित्वात आल्यामुळे विरोधी पक्ष शेतकºयांची दिशाभूल करीत आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य शेतकरी आनंदित दिसून येत आहे. शेतकºयांना आपला शेतमाल आता कृषी उत्पन्न बाजार समितीसह खुल्या बाजारामध्ये, खासगी बाजार समित्या, कारखानदार, एका गावातून दुसºया गावात, परजिल्ह्यात, परराज्यात व देशात कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. या स्वातंत्र्यामुळे शेतकºयांच्या शेतमालाला चांगले भाव मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न नक्कीच वाढणार, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कांद्यावरील निर्यात बंदी लवकरच हटेल - संजय धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 4:27 PM