अकोला - पातुर येथील रहिवासी तथा माजी नगराध्यक्ष हीदायत खा रुम खा याच्या बोडखा येथील कीसान ढाब्यावर इंडीयन आॅईलच्या टँकरमधून पेट्रोल व डीझेलची चोरी करून त्याची अवैधरीत्या विक्री करण्याच्या गौरखधंदयाचा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांनी शुक्रवारी दुपारी पर्दाफाश केला. या ढाब्यावरुन सुमारे २४ लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत.बोडखा येथील कीसान ढाब्यावरुन पातूरचा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष हिदायत खा रुम खा उर्फ इद्दु पहेलवान आणि त्याचा भाउ मम्मू हे दोघे गायगाव येथील इंडीयन आईलच्या पेट्रोलची आणि डीझेलची वाहतुक करणाऱ्या टँकरच्या चालक व वाहकासोबत मिळून संगनमताने टॅँकरमधील पेट्रोल व डीझेलची चोरी करून त्याची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर बहाकर व त्यांच्या पथकाने गत तीन दिवसांपासून या परिसरात पाळत ठेउन शुक्रवारी दुपारी छापेमारी केली. यावेळी कीसान ढाब्यावर टॅँकरमधून पेट्रोल व डीझेल एका नळीच्या साहायाने काढत असतांना त्यांना रंगेहाथ अटक केली. तर एका ठिकाणी साठविलेला पेट्रोल व डीझेलचा मोठा साठाही जप्त करण्यात आला आहे. तर पेट्रोल व डीझेल काढणाºया शेख नसीम शेख करीम रा. पातूर, अमजत खा सरदार खा पठान रा. रुद्रवाडी जिल्हा हिंगोली, अमजत खा जफरउल्ला खा रा. रुद्रवाडी कळमनुरी या तिघांना रंगेहाथ अटक केली असून घटनास्थळावरून साकीब नामक माफीया फरार होण्यात यशस्वी झाला. या टोळीकडून सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.
पातुर : माजी नगराध्यक्षाच्या ढाब्यावरील डीझेलच्या काळयाबाजाराचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 6:20 PM