प्रतिबंधित व आरोग्यास अपायकारक असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनची खदान परिसरात मोठ्या प्रमाणात जास्त दराने विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व विलास पाटील यांच्या नेतृत्वातील दहशतवाद विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने गुरुवारी खदान परिसरातील कच्ची खोली येथील जयप्रकाश कलाचंद मोटुवाणी (५०) याच्या घरी छापा टाकला. यावेळी झाडाझडतीमध्ये १० बॉक्समध्ये ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या २१३५ बॉटल आढळून आल्या. या इंजेक्शनची किंमत १०,६७,५०० रुपये एवढी आहे. हा सर्व साठा ताब्यात घेऊन जयप्रकाश मोटुवाणी व कमल शर्मा (रा. गया, बिहार) या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात कलम १७५, २७४, २७५, ३४, १८ (अ), १८ (क) २२ सीसीए, तसेच औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० च्या कलम २७ (ब), (२), २७ (ड), २८ व १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जयप्रकाश मोटुवाणीला अटक करण्यात आली, तर कमल शर्मा फरार झाला आहे.
ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:13 AM