.......................
एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट
अकाेला : शहरातील बहुतांश एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट असल्याने साेमवारी सकाळी ११ दरम्यान अनेकांची पंचाईत झाली. बँकांमध्ये गर्दी होऊ नये एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात पैसे ठेवण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
........................
प्लास्टिकचा सर्रास वापर
अकाेला : शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तरी येथे वापर सुरू आहे. या पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. कारवाई थंडावल्याने प्लास्टिकचा वापर वाढला आहे.
..........................
तूूर खरेदी सुरू होऊनही शेतकरी अडचणीत
अकाेला : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडअंतर्गत तूर खरेदी सुरू झालेली आहे. परंतु, अनेक नियम व अटींमुळे शेतकऱ्यांना तूरविक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या भावात तूर विक्री करीत आहेत.
....................
कोरोना अहवाल मिळण्यास विलंब
अकाेला : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोना अहवाल येण्यास विलंब लागत असल्याने टेस्ट करून आलेला व्यक्तीही कोरोना बाहेर वाटत फिरतो. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल २४ तासांच्या आत प्रयोगशाळांना देणे बंधनकारक करावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते कपिल रावदेव यांनी केली आहे.
..................................
दलित वस्ती योजनेची कामे अपूर्ण
अकाेला : अनेक गावांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतची कामे अपूर्ण आहेत, तर काही ठिकाणी या कामांची प्रतीक्षा आहे. सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, जलकुंभ आदी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांनी सीईओंकडे केली आहे.
........................
कोरोनामुळे समृद्ध गाव स्पर्धेला ‘ब्रेक’
अकाेला : मध्यंतरी समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला जोमात सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वाढल्यानंतर स्पर्धेला ‘ब्रेक’ लागला असून, प्रशिक्षणही थांबले आहे.
..........................
प्रोत्साहन अनुदानाची मागणी
अकाेला : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी केली. राज्य शासनाने घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
............
रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
अकाेला : अकाेला-गायगाव मार्गाचे काम रखडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्ता काम त्वरेने करण्याची मागणी यापूवीर्ही करण्यात आली होती; परंतु अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
..............
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेकडे लक्ष
अकाेला : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण निश्चित झाले असून, त्यानुसार प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केव्हा होतात, परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना मिळणार का, याकडे लक्ष लागून आहे.
..........
रोजगार सेवकांच्या मागण्या प्रलंबित
अकाेला : रोजगार हमी योजनेत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. मानधनात वाढ नाही तसेच दरमहा पहिल्या आठवड्यात मानधनही मिळत नसल्याने रोजगार सेवकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
..........
‘पोलीस पाटील यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा’
अकाेला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ‘ग्राऊड लेव्हल’वर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत असून, मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.