शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:01 AM

जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर या मुदतीत लाभार्थींकडून आवश्यक त्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही.

अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषद सेसफंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत २८ जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती; परंतु जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर या मुदतीत लाभार्थींकडून आवश्यक त्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांतर्गत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा ठराव समितीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य ज्योत्स्ना बहाळे, मंजूषा वडतकार, माया कावरे, वेणू चव्हाण, मंगला तितूर, माधुरी कपले, महिला व बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रशिक्षणाच्या योजनांसाठी १.२० कोटींची तरतूद!जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, मोबाइल व संगणक प्रशिक्षण, शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, बेकिंग व केटरिंग प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्याचेही या सभेत ठरविण्यात आले.

 

टॅग्स :Akola ZPअकोला जिल्हा परिषदAkolaअकोला