अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षेसाठी सत्र व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी २५ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह स्वीकारणे आवश्यक आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठात सादर करावे लागणार आहे.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात सादर केलेल्या परीक्षा अर्जाला स्वीकारण्यासाठी विद्यापीठात एडिटलिस्ट परीक्षा व मूल्यमापन मंडळ कार्यालयाच्या दर्शनी भागात लावलेल्या टेबलवर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. विनिर्दिष्ट अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या विद्यार्थ्यांकरिता ही अंतिम संधी असून, व्यक्तिगत व इतर कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज विद्यापीठात सादर करावयाची राहून गेली, अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी वाढीव तारीख दिली आहे. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे विभाग प्रमुख यांना पत्र पाठवून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी कळविले आहे.विनिर्दिष्ट अभ्यासक्रमासाठी शेवटची संधीविद्यापीठाच्या विनिर्दिष्ट अभ्यासक्रमांची ही शेवटची परीक्षा राहणार आहे. यानंतर सर्वांनाच सत्र पद्धतीने परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे विनिर्दिष्ट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आहे.