अकोला : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार नाफेडच्यावतीने राज्यामध्ये हरभऱ्याची खरेदी सुरू होती. सदर खरेदीची मुदत २९ मेपर्यंत होती; मात्र या खरेदीस आता १३ जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.नाफेडद्वारे सुरू असलेल्या या हभरा खरेदीसाठी एनईएमएल पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकºयांचाच हरभरा खरेदी करण्यात येणार असून, १३ जूनपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या हरभºयाची लॉट एंट्रीज त्याच दिवशी ५.00 वाजतापर्यंत पूर्ण करण्यात यावी, कोणत्याही परिस्थितीत एनईएमएलचे पोर्टल खरेदीची माहिती भरण्यासाठी पुन्हा उघडण्यात येणार नाही. त्यामुळे पोर्टलवर भरण्यात आलेली खरेदी अंतिम म्हणून गृहीत धरण्यात येईल. खरेदी करण्यात येणारा व खरेदी करण्यात आलेला हरभरा ज्या खरेदी केंद्रावर आहे, तो तत्काळ वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणूक करण्यात यावा तसेच सध्या पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत माल भिजणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक (अन्नधान्य) यांनी केली आहे.