सदर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत आहे; मात्र संबंधित विभागाच्या हलगर्जी व नियोजनशून्य कारभारामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या काही दिवसापासून चान्नी ते दिग्रस रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे; परंतु सदर दुरुस्तीच्या कामांमध्ये डांबरचे प्रमाण कमी असून, काही ठिकाणी विना डांबर गिट्टी टाकल्याचा प्रकार सुरू आहे. तसेच रस्त्यावरील अर्धे खड्डे तसेच सोडण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता काही महिन्यातच ‘जैसे थे’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले सारखे आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
फोटो:
कंत्राटदार व संबंधितांची मिलीभगत
कंत्राटदार व संबंधित विभागातील अभियंत्याची मिलीभगत असल्याने रस्त्याची दुरुस्ती थातूरमातूर केली जात आहे. तसेच संबंधितांकडून कागदावर भेटी दाखविल्या जात असल्याने संबंधित व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा आरोप परिसरातील वाहनधारक व ग्रामस्थाकडून होत आहे.
दुरुस्तीवर दरवर्षी लावलेला खर्च पाण्यात
या परिसरात रस्त्याची दरवर्षी डागडुजी केली जाते; परंतु डांबरचा प्रमाण कमी व अर्धे खड्डे तसेच सोडले जातात. निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याने दरवर्षी लावण्यात आलेला खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र आहे.