शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आता अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांवर अतिरिक्तचे गंडांतर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:04 AM

अकोला : माध्यमिक शिक्षण विभागाने मराठी शाळांमधील ७१  पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त  पदांवर समायोजन केल्यानंतर, आता जिल्हय़ातील अल्पसं ख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचा क्रमांक  लागणार आहे. अल्पसंख्याक शाळांमधील अंदाजे ८0 शिक्षक  अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देशिक्षकांमध्ये धास्ती समायोजन होईल की नाही, याचीच चिंता!

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शिक्षण विभागाने मराठी शाळांमधील ७१  पैकी ४२ शिक्षकांचे जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त  पदांवर समायोजन केल्यानंतर, आता जिल्हय़ातील अल्पसं ख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचा क्रमांक  लागणार आहे. अल्पसंख्याक शाळांमधील अंदाजे ८0 शिक्षक  अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हय़ातील ५२ मराठी शाळांमधील एकूण ७१ शिक्षक अ ितरिक्त ठरले होते. त्यापैकी ४२ जणांचे समायोजन करून,  उर्वरित २४ जणांना विभाग स्तरावर समायोजन होणार  असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील  शिक्षकांमध्येही अतिरिक्त ठरण्याची धास्ती निर्माण झाली असून,  अतिरिक्त ठरल्यानंतर आपले समायोजन होईल की नाही आणि  बाहेरगावी झालेच तर काय करावे, अशी चिंता शिक्षकांना सतावू  लागली आहे. अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील अल्पसं ख्याक शाळांना मागितली असून, शाळा शिक्षण विभागाकडे  माहिती पाठवित आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या  समायोजनाची ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येणार  आहे. गतवर्षी जिल्हय़ामध्ये मराठी शाळा आणि अल्पसंख्यक  शाळांमधील ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यातील काही  शिक्षक वगळता, उर्वरित शिक्षकांचे रिक्त जागा असलेल्या  शाळांवर समायोजन करण्यात आले होते.यावर्षीसुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील  शाळांकडून शिक्षकांची पदसंख्या, आरक्षण, रिक्त पदे याची  माहिती मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर काही दिवसा तच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची  यादी प्रकाशित करण्यात येईल आणि दोन दिवस शिक्षकांना  हरकती नोंदविण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर सुनावणी  घेऊन लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया  राबविण्यात येईल. 

शाळा न निवडल्यास सेवासमाप्तीअतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करताना, आरक्षण  आणि विषयाचा विचार करण्यात येत आहे. अतिरिक्त  शिक्षकांना पाच ते सहा राउंडपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यातही  ऑनलाइन शाळा निवडताना, कोणाला दोन ते कोणाला एकच  शाळा पर्याय म्हणून मिळते. त्यामुळे विचार करायलाही वेळ  मिळत नाही. शिक्षकाला शाळा पसंत नसल्यावरही त्याला शाळा  निवडणे भागच आहे. कारण शाळा निवडली नाही, तर शिक्षण  विभागाला मूळ आस्थापना असलेल्या शाळेला पत्र देऊन  संबंधित शिक्षकांची सेवासमाप्ती करण्याचे अधिकार आहेत. 

समायोजन झाल्यावरही संस्थाध्यक्षाचा नकारमराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदे असलेल्या  शाळांमध्ये शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी समायोजन केले  आणि त्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या समक्ष स्वाक्षरी घेऊन  त्यांना रुजू करून घेण्याचा आदेश दिला.त्यानंतरही अनेक  शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव समायोजित शिक्षकाला आ पल्या शाळेमध्ये रुजू करून घेण्यास नकार देत आहेत. शहरातील मलकापुरातील एका शाळेचा संस्थाध्यक्ष समायोजित  शिक्षकाला रुजू करून घेण्यास नकार देत आहे आणि त्यास  धमक्या देत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

बाहेरगावची शाळा नको रे बाबा..मराठी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन  समायोजनाची प्रक्रिया २८ सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. यात  अनेक शिक्षकांचे जिल्हय़ातील दूर अंतरावरील शाळांमधील रि क्त पदांवर समायोजन करण्यात आले. त्यामुळे अनेक शिक्षक  निराश झाले. आता अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकही बाहेरगावच्या  शाळांमधील रिक्त पदांवर जाण्यास फारसे इच्छुक नाहीत.  शहरातील शाळा मिळावी, यासाठी अनेकजण देवाकडे प्रार्थना  करीत आहेत.