अकोला: गेल्या आठवड्यात जिल्हय़ात अतीवृष्टीमुळे घरांच्या पडझडीसह झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल अकोला तालुका वगळता जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालयांकडून अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला नाही. त्यामुळे अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे.गेल्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुका वगळता जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली. अ ितवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. या पृष्ठभूमीवर अतवृष्टीमुळे नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना देण्यात आले होते. त्यानुसार अकोला तालुक्यात २३ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला; परंतु उर्वरित आकोट, तेल्हारा, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर इत्यादी सहा तालुक्यात अतवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल अद्यापही संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे संबंधित सहा तालुक्यांमध्ये घरांच्या पडझडीसह झालेल्या नुकसानीचे चित्र अद्यापही स्पष्ट होणे बाकी आहे.
अतीवृष्टीच्या नुकसानीचे अहवाल प्रलंबित
By admin | Published: September 15, 2014 2:01 AM