शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

नरनाळा, असदगडचा चेहरामोहरा बदलणार - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 1:06 PM

किल्ले नरनाळा व असदगडचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दिली.

अकोला: अकोट तालुक्यातील नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड किल्ला व परिसराचा विकास करण्यासाठी ९५ कोटी ३० लाख रुपयांच्या विकास कामांचे नियोजन करण्यात आले असून, विकास कामांद्वारे किल्ले नरनाळा व असदगडचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी दिली.राज्याच्या अर्थसंकल्पात अकोट तालुक्यातील नरनाळा आणि अकोला शहरातील असदगड विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पुरातत्त्व विभागाचे मिलिंद अंगाईतकर, पर्यटन विभागाचे हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण सरनाईक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वुई थ्री डिझाइन स्टुडिओचे आयुष गुप्ता उपस्थित होते.नरनाळा किल्ल्याची ओळख कायम त्याच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता किल्ले नरनाळा परिसर सुंदर-देखणा व शोभिवंत करण्याचे सांगत, उन्हाळ्यातही नरनाळा परिसर हिरवागार राहील, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नरनाळा परिसरात मेंढा गेट महाकाली गेट आणि राणी महलापर्यंत पर्यटकांसाठी पाऊलवाट निर्माण करण्याचे सांगत नरनाळा किल्ला विकासासोबतच पायथ्याशी असलेल्या शहानूर गावाचाही विकास करण्यात यावा. त्यासाठी स्थानिक आदिवासींना विश्वासात घेऊन, तेथील घरे व रस्त्यांचा विकास करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे खाद्य, वस्त्र, सण व त्यांची संस्कृती जपणारे गाव निर्माण करण्यात यावे आणि पर्यटकांसाठी रिसोर्ट निर्माण करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकास कामांसाठी निधीचे नियोजन!नरनाळा विकास आराखड्यांतर्गत मंजूर ९५.३० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये पुरातत्त्व विभागासाठी २३ कोटी, पर्यटन विभागासाठी १८ कोटी, वन विभागांतर्गत कामांसाठी ६२ लाख रुपये, बांधकाम विभागांतर्गत कामांसाठी ३९ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले. तसेच अकोला शहरातील असदगड किल्ला विकास कामांसाठी १३ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत सांगितले.

टॅग्स :Narnala Fortनरनाळा किल्लाBacchu Kaduबच्चू कडूAsadgad Fortअसदगड किल्लाAkolaअकोला