न्यू तापडिया नगर-खरप रस्त्याची दुरुस्ती करा!
अकोला : प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू तापडियानगर ते खरप या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, वाहनांची वर्दळ असल्याने हा रस्ता खराब झाला आहे. येत्या १५ दिवसांत या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आधार फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष माणिक शेळके, राहुल ठाकूर, गौरव पांडे, सुशील ठाकरे, सुमित ठाकरे, मंगल इंगळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली.
सामाजिक सभागृहाचे लाेकार्पण
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये आमदार गाेवर्धन शर्मा यांना शासनाकडून प्राप्त निधीतून सभागृहाची उभारणी करण्यात आली. शुक्रवारी आमदार शर्मा, महापाैर अर्चना मसने, सभापती संजय बडाेणे, माजी उपमहापाैर वैशाली शेळके, नगरसेविका रंजना विंचनकर, मा. नगरसेविका मंगला म्हैसने, नीलेश निनाेरे यांच्या उपस्थितीत संत साईबाबा सभागृहाचे लाेकार्पण करण्यात आले.
आयुक्तांकडून नायगावातील रस्त्याची पाहणी
अकाेला : प्रभाग क्रमांक १ अंतर्गत असलेल्या नायगाव परिसरात मूलभूत सुविधांची दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगरसेविका अजरा नसरीन मकसूद खान यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत शुक्रवारी मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी नायगावातील रस्त्यांची पाहणी केली.
उड्डाणपुलाखाली साचले पावसाचे पाणी
अकाेला : शहरात खदान पाेलीस ठाणे ते रेल्वे स्टेशन राेडपर्यंतच्या निर्माणाधीन उड्डाणपुलाखाली रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पावसाचे पाणी व रस्त्यालगतच्या दाेन्ही बाजूच्या दुकानांमधील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केले जात आहे. परंतु नाल्यांचे बांधकाम नियमानुसार हाेत नसल्याने पावसाचे पाणी साचत असल्याचे समाेर आले आहे. भविष्यातही ही समस्या कायम राहणार असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
जलवाहिनीसाठी रस्त्यालगत खाेदकाम
अकाेला : जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी जुने शहरातील डाबकी राेड भागातील कामगार कल्याण केंद्रासमाेर खाेदकाम करण्यात आले. परंतु रस्त्यावर माेठ्या प्रमाणात माती साचली असून, या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता ही माती तातडीने हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील कंत्राटदाराने खाेदलेली माती रस्त्यावर साचली हाेती.
आंबेडकर मैदानात साचले पाणी
अकाेला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या डाबकी राेड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात पावसाचे माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच मैदानालगतचा मुख्य नाला घाणीने तुडुंब साचला आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, साफसफाईकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे. या समस्येकडे आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी समाेर आली आहे.