शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

धडक सिंचन योजनेतील विहिरी ‘नरेगा’मध्ये वर्ग!

By admin | Published: January 29, 2015 11:29 PM

अमरावती विभागातील १३ हजारांवर सिंचन विहिरींचा समावेश.

संतोष येलकर/अकोला:धडक सिंचन विहीर योजनेतील सिंचन विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) वर्ग करण्याची प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १३ हजार ८00 सिंचन विहिरींचा समावेश आहे.विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी २00६ पासून शासनामार्फत धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना एक लाखापर्यंत अनुदान दिले जात होते. २३ जानेवारी २0१४ च्या शासन निर्णयानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील अपूर्ण सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदानात वाढ करण्यात आली. तसेच धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अपूर्ण आणि प्रगतीपथावरील सिंचन विहिरी वगळता शिल्लक असलेल्या विहिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार धडक सिंचन विहीर योजनेतील शिल्लक असलेल्या सिंचन विहिरींची कामे ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील धडक सिंचन विहिरी योजनेतील १३ हजार ८२0 सिंचन विहिरींची कामे ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आली आहेत. ह्यनरेगाह्णअंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना तीन लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे.अमरावती विभागाचे उपआयुक्त (रोहयो) एस.टी.टाकसाळे यांनी धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात १३ हजार ८२0 सिंचन विहिरी ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आल्या असल्याचे सांगीतले. या सिंचन विहिरींचे खोदकाम मार्चअखेर आणि बांधकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. * ३१ मार्चपूर्वी खोदकाम; जूनअखेर बांधकामाचे निर्देश!धडक सिंचन विहीर योजनेतून ह्यनरेगाह्णमध्ये वर्ग करण्यात आलेल्या सिंचन विहिरींचे खोदकाम येत्या ३१ मार्चपर्यंत आणि बांधकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागामार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांना देण्यात आले आहेत. *'नरेगा'मध्ये वर्ग जिल्हानिहाय विहिरी!जिल्हा                    विहिरीअमरावती               ३७३३यवतमाळ               ४९१0अकोला                  १५0४बुलडाणा                २३८0वाशिम                  १२९३....................एकूण                   १३८२0