लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : साेशल मीडियाचा वापर माेठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा दुरपयाेग करणारे गुन्हेगारही सक्रीय झाले आहेत. गत काही वर्षापासून फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट तयार करायचे आणि त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहे. जिल्हाभरात सन २०१९ ते २०२१ च्या जून पर्यंत २७ गुन्हे दाखल झाले आहेत. काेराेनाच्या काळात अशा तक्रारी वाढल्या आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. अनेक जण समाजमाध्यमांचा माेठ्या प्रमाणात वापर करतात. सायबर गुन्हेगार फसवणुकीचे अनेक मार्ग शाेधत असतात. गत काही वर्षात फेसबुकवर एखाद्याच्या नावाने बनावट अकाउंट काढायचे, त्याच्या मित्रांना पैशांची मागणी करायची,असा नवीन प्रकार सायबर गुन्हेगारांनी सुरू केला आहे. असा प्रकार घडल्यास तातडीने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. त्यावर सात दिवसात ते अकाउंट बंद करण्यात येते.