अकोला : कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मिळणार, असा बनावट मेसेज आणि सोबत बनावट अर्ज व्हायरल झाल्याने, त्या आधारे काही जणांकडून २५ ऑगस्टपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. मात्र, अशी कोणतीही योजना किंवा शासन निर्णय नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई मिळणार, असा बनावट मेसेज आणि त्यासोबत बनावट अर्ज व्हायरल झाला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात जिल्ह्यातील काही जणांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षासह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. तसेच काही जणांनी भ्रमणध्वनीद्वारे विचारणा केली; परंतु कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासंदर्भात कोणतीही योजना किंवा शासन निर्णय प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काय आहे बनावट मेसेज?
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार असा बनावट मेसेज आणि त्यासोबत बनावट अर्जदेखील व्हायरल झाला होता. त्याआधारे जिल्ह्यातील काही जणांकडून यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षासह निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली.
अशी कुठलीही योजना, शासन निर्णय नाही!
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मिळणार, असा बनावट मेसेज व्हायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात जिल्ह्यातील काही जणांकडून भ्रमणध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली. त्यावेळी अशी कुठलीही योजना नाही तसेच शासन निर्णय प्राप्त झाला नाही, असे संबंधितांना सांगण्यात आले. यासोबतच बनावट मेसेजच्या आधारे मदतीसाठी अर्ज करू नये, असेही सांगण्यात आले.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी