अकोला : अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळांना शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी प्रस्तावावर गटशिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह संस्थाध्यक्ष, सचिवावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. गटशिक्षणाधिकाºयांनी शनिवारी मूर्तिजापूर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, हलगर्जी केल्याने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिला आहे.धार्मिक अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते. शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील शाळांनी प्रस्ताव सादर केले. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलचा प्रस्तावही सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त प्रस्तावांची पडताळणी जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकाºयांमार्फत करण्यात आली. त्यावेळी नॅशनल उर्दू हायस्कूलच्या प्रस्तावावर मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांची स्वाक्षरी बनावट असल्याचे उघड झाले. गटशिक्षणाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना तसे लेखी स्वरूपातही दिले. त्या अहवालानुसार संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना १ डिसेंबर २०१८ रोजी देण्यात आला. शिक्षणाधिकाºयांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. दरम्यान, शेख रियाज शेख रऊफ यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. २४ जूनपर्यंत ही कारवाई करून तसा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावयाचा आहे. विशेष म्हणजे, शिक्षणाधिकाºयांना आदेश दिल्यानंतरही त्यांनी कारवाई न केल्याने त्यांच्यावरही कारवाई करून तसाच अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना बजावले आहे.- अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापिकेवर फौजदारी गुन्हेयाप्रकरणी मूर्तिजापूर पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी स्मिता धावडे यांच्या तक्रारीनुसार पब्लिक एज्युकेशन संस्थेचा अध्यक्ष शेख नासिर शेख हुसेन, सचिव अहमद अली अमजद अली, मुख्याध्यापिका रिजवाना परवीन नासिर शेख या तिघांवर भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४६८,४७१, (३४) या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.