- राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मका पिकावर उपजिविका करणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीने आता दुसºया पिकाकडे मोर्चा वळविला असून, देशात प्रथमच अहमदनगर जिल्ह्यात कपाशी पिकावर ही अळी आढळून आली. विदर्भात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने याची दखल घेत शास्त्रज्ञांना सतर्क राहण्याची सुचना केली आहे.राज्यात ठिकठिकाणी या अळीने मका पीक फस्त केले असून, मका पीक काढणीनंतर इतर पिकांकडे मोर्चा वळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातून संपूर्ण राज्यात प्रवेश करणारी ही अळी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या सुसरे गावात कपाशीवर आढळून आली आहे. बहुभक्षीय ही अळी ८० पिकांवर उपजीविका करते. विदर्भात सध्या तरी कपाशीवर ही अळी दिसली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शेतकरी,शास्त्रज्ञांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.भविष्यातील या अळीचा धोका बघता लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ््याचा वापर करावा लागणार असून, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनासाठी जे ल्यूअर्स असतात त्यात बदल करू न नवे ल्यूअर्स तयार करावे लागणार आहेत. या अनुषंगाने कृषी विद्यापीठ लवकरच संशोधन हाती घेण्याची शक्यता आहे.
देशात प्रथमच अहमदनगर जिल्ह्यातील सुसरे गावात कपाशीवर लष्करी अळी आढळून आली आहे.मका पिकाच्या शेजारी असलेल्या कपाशी पिकावर या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे तसेच कामगंध सापळ््यांचा वापर करावा.-डॉ.एन.के.भुते,किटकशास्त्रज्ञ,कापूस सुधार प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी.
पश्चिम महाराष्टÑात कपाशीवर ही अळी दिसून आली आहे. असे झाले तर कपाशी पिकासाठी ते धोकादायक ठरणारे आहे. विदर्भात ही अळी अद्याप दिसली नाही. तथापि, भविष्यातील धोका बघता ‘लष्करी’च्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे व ल्यूअर्स तयार करावे लागणार आहे. त्यासाठीचे संशोधनही करावे लागेल.-डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.