शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

कृषी विद्यापीठातील वित्त विभागात सावळा गोंधळ

By admin | Published: April 11, 2017 1:47 AM

आर्थिक वर्ष संपले तरी व्यवहार सुरूच : कार्यकारी परिषद सदस्यांनी मागितले स्पष्टीकरण

अकोला: आर्थिक वर्ष संपुष्टात येऊन दहा दिवस झाले असले तरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वित्त विभागातून ३१ मार्चच्या तारखेची देयके राजरोसपणे काढली जात आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपी ठाकरे यांनी कुलगुरू डॉ. रवींद्र दाणी यांच्याकडे विद्यापीठातील वित्त विभागात सुरू असलेल्या सावळ्य़ा गोंधळासंदर्भात सोमवारी तक्रार केली असून, याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.देशासह राज्यातील आर्थिक व्यवहार पारदश्री व्हावे म्हणून शासनाने कॅशलेसला चालना दिली. आर्थिक व्यवहार ऑनलाइन केलेत. एकीकडे शासनाचे धोरण पारदश्री होत असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वित्त विभागातून मात्र एप्रिल महिन्यात मार्चचे देयक काढले जात असल्याचा आरोप आहे. डॉ. पंदेकृ विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गोपी ठाकरे यांनी कुलगुरूंकडे तक्रार करून आर्थिक व्यवहार सुरू ठेवल्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. शासनाचा विविध विकासाचा निधी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत (३१ मार्चपर्यंत) खर्च व्हावा आणि अखर्चित निधी शासनाकडे परत पाठवावा, असा नियम आहे; मात्र बॅकडेटमध्ये आर्थिक व्यवहाराचा सावळा-गोंधळ सुरू आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो आहे.     विद्यापीठाच्या वित्त विभागाने ३१ मार्च १७ रोजी विद्यापीठाच्या निमंत्रक कार्यालयातून निर्गमित झालेल्या शेवटच्या धनादेशाचा क्रमांक व छायांकित प्रत द्यावी, तसेच अखर्चित व शासनाला परत पाठविलेल्या निधीबाबत माहिती द्यावी, असेही ठाकरे यांनी पत्रातून म्हटले आहे.

कृषिमंत्र्यांनी गोठविले कुलगुरूंचे अधिकार डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र दाणी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्याने आणि अल्पावधीतच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी ३ एप्रिल रोजीच्या एका पत्रकान्वये कुलगुरूंचे अधिकार गोठविले आहे. यादरम्यान कोणतेही मोठे आर्थिक किंवा प्रशासकीय निर्णय घेऊ नये, असेही त्यास स्पष्ट केले आहे. याबाबत कृषी विद्यापीठाचे माहिती अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांच्याशी संपर्क साधला असता, अद्याप तसे पत्र कार्यालयास मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.आर्थिक वर्षातील विविध बिल स्वीकारण्याची प्रक्रिया ३१ मार्च रोजी बंद झाली आहे. ट्रेझरीतून अजूनही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे रक्कम आल्यानंतर देयके दिले जात आहेत. यात सावळा गोंधळ नाही.-विद्या पवार , नियंत्रक (कॅफो) डॉ.पंदेकृवी अकोला.