पातूर (जि. अकोला), दि. १४- नजीक असलेल्या चिंचखेड येथे ११ सप्टेंबरपासून घरामधून निघून जाऊन एका आईने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचे १३ सप्टेंबरला उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.चिंचखेड येथील सदन कास्तकार दीपक धाडसे यांच्या शेतात शेतमजूर सुनील झळके हा त्याची पत्नी पूजा व शुभांगी (४ वर्षे) व गोविंदा (२ वर्षे) असे चौघेजण दोन महिन्यांपासून राहत होते; मात्र ११ सप्टेंबरला घरगुती कारणावरून सुनील व पूजा यांचे किरकोळ भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेवून पूजा काही दूर अंतरावर राहत असलेल्या आपल्या भावाकडे जात असल्याचे सांगून दोन चिमुकल्यांसह घरातून निघून गेली; परंतु तिने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली; मात्र पूजाने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची बाब १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेबाबत पोलीस पाटील रुस्तम धंदरे यांनी पातूर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली असता, ठाणेदार अनिरुद्ध अढाव व सहकार्यांनी धाव घेऊन तिन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. तिन्ही मृतदेह पोस्टमार्टेमकरिता अकोला येथे रवाना करण्यात आले. पोस्टमार्टेमनंतर चिंचखेड येथे अंत्यसंस्कार रात्री १२.३0 वाजताच्यादरम्यान शोकाकुल वातावरणात करण्यात आला. पातूरच्या नागरिकांनी केली मृतदेह काढण्यास मदतपूजा झळकेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली; मात्र विहिरीतून मृतदेह काढण्यासाठी केवळ पातूर शहरामधील दुलेखान युसुफखान व कैलास बगाडे यांनीच मदत केली.
कौटुंबिक कलहातून पूजाने केली आत्महत्या!
By admin | Published: September 15, 2016 3:04 AM