मधुकरराव पवार महाविद्यालयात मराठी भाषा दिन
बार्शीटाकळी : येथील मधुकरराव पवार कला महाविद्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. श्यामली दिघडे होते. अतिथी म्हणून डॉ. सुवर्णा घाडगे होत्या. डॉ. घाडगे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन डॉ. माधुरी पाटील यांनी केले. आभार प्रा. विद्या गावंडे यांनी मानले.
जि.प. शाळेला शैक्षणिक साहित्य भेट
बार्शीटाकळी : खालिद बीन वलिद शिक्षण व कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शाहिद इकबाल खान यांच्याकडून जि.प. मराठी बिहाड माथा शाळा महान येथे शुक्रवारी शैक्षणिक साहित्य भेट दिले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश राठोड, अंगणवाडी सेविका सुनंदा तायडे उपस्थित होते.
मूर्तिजापुरात दुकाने उघडण्याची परवानगी
मूर्तिजापूर : शहरातील सर्व प्रकारची दुकाने, प्रतिष्ठाने सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी परवानगी दिली आहे. परंतु सर्व व्यावसायिक, दुकानदार, कामगारांची कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक राहील. लग्नसमारंभासाठी तहसीलदारांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.
शाळाबाह्यच्या सर्वेक्षणाला स्थगित द्या
नया अंदुरा: कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, शाळा सर्वेक्षण थांबविण्याची मागणी परिसरातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी केली. कोरोनाचे दररोज रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा धोका पाहता, शाळाबाह्यच्या सर्वेक्षणाला स्थगित द्यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
कोरोना तपासणी शिबिर संपन्न
माझोड : माझोड ग्रामपंचायत कार्यालयात ५ मार्च रोजी कोरोना तपासणी शिबिर पार पडले. व्यापारी,चक्की चालक, ज्यांना बीपी, मधुमेह रुग्ण, गर्भवती स्रिया किंवा ६० वर्षांवरील सर्वांनी तपासणी करून घेतली. यावेळी पं. स. सदस्य राजेश ठाकरे, सरपंच पुष्पा बोबडे, उपसरपंच शिवलाल ताले व ग्रामसेविका मधुशीला डोंगरे उपस्थित होते.
हिवरखेड येथे महिलेचा विनयभंग
हिवरखेड: दानापूर येथे विवाहितेला नेहमी अश्लील इशारे करून पाठलाग करणाऱ्या महादेव किसन धर्मे (३५, रा. दानापूर) याच्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. धर्मे हा दाेन वर्षांपासून महिलेला त्रास देत होता. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.