अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. घरात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, तसेच बाजारात शेतमाल विकल्यानंतर अडत्यांकडून पंधरा दिवसांनंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देण्यात येतात. विकलेल्या शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासह मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, शेतीची कामे इत्यादी प्रकारच्या शेतकºयांच्या व्यवहारावर परिणाम होत आहे.शेतकºयांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, गरज भागविण्यासाठी बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनी अडत्यांकडून शेतकºयांना शेतमालाचे पैसे दिले जातात. शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-मनोज तायडे,शेतकरी जागर मंच.बाजारात असे आहेत शेतमालाचे दर!सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये, तूर प्रतिक्विंटल ४६०० ते ५००० रुपये, कापूस प्रतिक्विंटल ५२०० ते ५५०० रुपये, सोयाबीन प्रतिक्विंटल ३४०० ते ३६०० रुपये, मूग प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये असे शेतमालाचे दर आहेत.