अंदुरा (अकोला) : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील ४२ वर्षीय शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ मे रोजी सकाळी १० वाजता उडकीस आली. गणेश वासुदेव बायस्कर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.अंदुरा येथील गणेश वासुदेवराव बायस्कर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. या शेतीच्या मशागत व पेरणीकरिता त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते; परंतु या वर्षी पावसाने मोक्याच्या क्षणी हुलकावणी देत शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक हिसकावून घेतले होते. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे या वर्षीचे पीक कर्ज कसे भरावे, या विवंचनेत सापडलेल्या बायस्कर यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस स्टेशनचे मावस्कार, बिट जमादार गजानन ढोणे व त्यांचे सहकारी यांनी त्वरित येऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, अकोला येथे पाठवला. या वेळी पोलीस पाटील ज्ञानेश्वर रोहणकर, सरपंच पती संजय वानखडे, कोतवाल राजेश डाबेराव, सुरेश गोरे, राहुल उमाळे आदी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
अंदुरा येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 6:30 PM
अंदुरा (अकोला) : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अंदुरा येथील ४२ वर्षीय शेतकºयाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देअंदुरा येथील गणेश वासुदेवराव बायस्कर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. या शेतीच्या मशागत व पेरणीकरिता त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. विवंचनेत सापडलेल्या बायस्कर यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.