त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा उंबर्डा बाजारचे एक लाख रुपये कर्ज आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, परंतु त्यांना कर्ज माफी न झाल्यामुळे त्यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली. कर्ज माफी न मिळाल्यामुळे याबाबत त्यांनी अनेकदा बँकेला विचारणासुद्धा केली; परंतु त्यात त्यांचे समाधान न झाल्यामुळे शेवटी कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी तसेच नातवंडे असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे करीत आहेत.
शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:52 AM