बाळापूर : कासारखेड भागात राहणारे शेतकरी वैभव पांडुरंग रोकडे (३३) हे सातरगाव शिवारातील असलेल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांच्या शेताच्या शेजारच्या शेतकºयाने आपल्या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी वीज प्रवाह लावला होता. या तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी वैभव रोकडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी घटनेस कारणीभूत ठरणाºया शेतकºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शेतकरी वैभव रोकडे (३३) हे सातरगाव शिवारातील शेतात फेरफटका मारायलोगेले होते. शेतातून फिरता फिरता शेजारच्या शेतातून रस्त्याने जात असताना त्यांना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शेजारी फियायत उल्लाखा नियामखा यांची शेती आहे; मात्र त्यांनी यंदा जावेदसाहेब जब्बारसाहेब याला शेती ठोक्याने दिली आहे. जावेदसाहेब जब्बारसाहेब या शेतकºयाने वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतात वीज प्रवाह जोडला आहे. याच विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी वैभव रोकडे (३३) यांचा मृत्यू झाला. पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरणाºया जावेद जब्बारसाहेब याच्याविरुद्ध भादंवि ३०४ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.