शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यावसायिक व्हावे - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 5:56 PM

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.

अकोला: शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जे विकले जाते तेच पिकवावे तद्वतच कंपनी चालवत असताना व्यवहारिक, व्यावसायिक दृष्टीकोण ठेवावा,तेव्हाच प्रगती साधता येईल असे आवाहन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्यावतीने पश्चिम विदर्भातील शेतकरी उत्पादक कंपन्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. बोंडे यांनी विदर्भातील शेतकरी,कंपन्या,शसनाच्या विविध योजना आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, मिनल अनिल बोेंडे यांची उपस्थिती होती. तसेच मंचावर डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ. विलास भाले,डॉ.विलास खर्चे,डॉ.दिलीप मानकर,डॉ.महेंद्र नागदेवे,डॉ.प्रकाश कडू,कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर,विनायक सरनाईक यांची उपस्थिती होती.पश्चिम महाराष्टÑाचा आपण उदो-उदो करतो तथापि विदर्भाला १९६० पासून पाणीच मिळू दिले नाही.पाणीच नसल्याने ४५ अंश तापमानात येथील शेतकरी शेतात करणार काय?असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. एवढेच नव्हे तर पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भात पाणी आणण्याची वैनंगगा ते पैनगंगा योजना राबविण्यात येणार आहे.एवढेच नव्हे तर पश्चिम वाहिन्यांचे जे पाणी समुद्राला मिळते ते पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.मागील सरकारच्या काळातील ५२ हजार कोटींच्या कर्जाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच झाल्याची टिका करताना आम्ही मात्र संपूर्ण राज्याचा विचार करू न कर्जमाफी केल्याचे ते म्हणाले.हे सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, विविध योजना उद्योगासाठी मिळणारे अनुदान कर्जात वळते करू नये,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.पोहरे यांनी विदर्भात नियोजन नसल्याने येथील एक लाख कोटी रू पये दरवर्षी विदर्भाबाहेर जात आहेत.पश्चिम महाराष्टÑातील यशाच गमक समजून आपल्या शेतकºयांना वाटचाल करावी लागणार आहे.त्यांची देशी कापूस सोडून आपण एच-४,बीटी च्या मागे लागल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आता तर एचटीबीटी कापसाच्या माध्यमातून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. मिनल बोंडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीकरीता आर्थिक नियोजन पध्दती या विषयावर तर डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.संचालन डॉ.प्रदीप बोरकर यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnil Bondeअनिल बोंडेAgriculture Sectorशेती क्षेत्र