समोर आळशी संकुल येथील भाजप कार्यालयात सचिवाला गुलाबपुष्प व ग्रिटींग देऊन काळे कायदे मागे घ्यायला सांगा, अशी विनंती तरुणांनी केली. तरुणांनी गुलाबपुष्प व ग्रिटींग देत टाॅवर चौक, बस स्टॅंड व जिल्हाधिकारी निवासस्थानमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात युवक पोहोचले. शेकडो युवकांनी अप्पर जिल्हाधिकरी अनिल खंडागळे यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देऊन ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेन्टाईन’, अशी विनंती केली. आंदोलनात शेतकरी जागर मंचचे संयोजक कपिल ढोके, ॲड.कोमल हरणे, अक्षय राऊत, अंकिता अंधारे, शिवानी डिवरे, राधिका पाटील, प्राची घडेकार, सुमैय्याअली, मृणाल इंगळे, आकाश कवडे, कुणाल शिंदे, अंकुश गावंडे, कुणाल डिवरे, रितेश महल्ले, सारंग शिंदे, अंकुश तायडे, आकाश पवार, रेहान, वैभव चऱ्हाटे, पवन मंगळे, पवन गावंडे, शाम मनतकार, उद्धव भाकरे,शैलेश बोदडे,अभिषेक वानखडे अभिजित मुळे,बंटी मुरुमकार, केदार बकाल, रेहान, देवानंद गावंडे यांच्यासह शेकडो युवक सहभागी होते.
शेतकरी पुत्रांचे ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेन्टाईन’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:17 AM