संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी वादळी वार्यासह अतवृष्टीमुळे पीक नुकसानभरपाईपोटी जिल्हय़ातील शेतकर्यांना मदत देण्यासाठी पीक विमा काढलेले शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र वगळून निधी मागणीची माहिती शासनाकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे पीक विमा काढणारे जिल्हय़ातील शेतकरी ह्यअतवृष्टीह्णच्या मदतीतून बाद होणार आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते ऑक्टोबर २0१६ या चार महिन्यांच्या कालावधीत वादळी वार्यासह अतवृष्टीमुळे जिल्हय़ातील शेती पिके आणि फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्हय़ातील अकोला, बाळापूर, बाश्रीटाकळी व पातूर या चार तालुक्यांत २ हजार १२८ शेतकर्यांचे १ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल गत ८ मे २0१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर वादळी वार्यासह अतवृष्टीमुळे जिल्हय़ातील पीक नुकसान झालेले शेतकरी आणि शेतीच्या क्षेत्रापैकी गतवर्षी पीक विमा काढलेले शेतकरी आणि पीक नुकसानाचे क्षेत्र वगळून, किती शेतकर्यांनी पीक विमा काढला आणि किती शेतकर्यांनी पीक विमा काढला नाही, याबाबत अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी लागणार्या निधीची माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाचे मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी १२ जून २0१७ रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. त्यानुसार वादळी वार्यासह अतवृष्टीमुळे पीक नुकसानभरपाईपोटी शासनाकडून अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मिळणार्या मदतीतून पीक विमा काढलेले शेतकरी बाद होणार आहेत.माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू!शासन आदेशानुसार, गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टीमुळे जिल्हय़ात पिकांचे झालेले नुकसान त्यापैकी पीक विमा काढलेले शेतकरी आणि शेतीचे क्षेत्र तसेच पीक विमा न काढलेले शेतकरी व शेतीचे क्षेत्र आणि पीक विमा न काढलेल्या अतवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी लागणारा मदत निधी यासंदर्भात माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे.
शेतकरी ‘अतिवृष्टी’च्या मदतीतून होणार बाद!
By admin | Published: June 19, 2017 4:38 AM