शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

बोंडअळीच्या मदतीसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 2:00 AM

मूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. 

ठळक मुद्देसर्वाधिक पेरा असलेली मंडळेच वगळली : चुकीच्या सर्वेक्षणाचा शेतक-यांना फटका, ३३ टक्क्यांच्या अटीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून मुकण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : कपाशी पिकावरील बोंडअळीग्रस्तांमधून तालुक्यातील मूर्तिजापूरसह लाखपुरी व कुरूम ही महसूल मंडळेच वगळण्यात आल्याने शेतक-यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वगळण्यात आलेल्या मंडळातील शेतकºयांना ही मदत मिळावी, या मागणीसाठी शेतकºयांनी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन सादर करून मदतीची मागणी केली आहे, अन्यथा १० दिवसांनंतर शेतकरी उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, शेलुबाजार, निंभा, कुरूम ही मंडळे  बोंडअळीच्या मदतीपासून का वगळण्यात आली आहेत. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतक-यांनी बोंडअळीच्या नुकसानासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या त्यांच्या शेतामध्ये मंडळ अधिकारी, कृषी सहायकांनी पाहणी केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती व तालुकास्तरीय समिती यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक झाडांची १०० बोंड्यांपैकी ७०/८० बोंड्या नुकसानग्रस्त असल्याची त्यांनी पाहणी केली.  पालकमंत्री रणजित पाटील यांनी जांभा खु. व शेलुबोंडे येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतावर स्वत: पाहणी केली. खासदार संजय धोत्रे यांनी पुंडलिक नगर येथील विवेक पातोंड यांच्या शेतावर जावून बोंडअळीची पाहणी केली. सर्वांनी पाहणी केल्यानंतर जिल्हास्तरीय पाहणी आली. त्यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या समितीने नुकसानग्रस्त बोडंअळीच्या कपाशीची पाहणी करून ही कपाशी तत्काळ काढून शेत मोकळे करा, असे प्रत्येक शेतकºयांना सांगितले. शेतकºयांमधील रोष पाहता नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर न झाल्यास शहीद धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नैसर्गिक संकटाच्या मालिकेने आधीच शेतकरी हतबल झाला आहे; मात्र त्याच्या विषयी कुठलेही धोरण न आखता शासन त्याची क्रूर थट्टा करीत आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. यावर्षी बोंडअळीच्या कहराने कापूस बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया या भागातील कापूस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्या भागाचा पालकमंत्री रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे व जनप्रतिनिधीने दौरे करून पाहणीदेखील करून सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे. यावेळी ९०/ १०० कापसाची बोंडे कपाशीला होती; मात्र त्यामध्ये बोंडअळीचा शिरकाव झाल्याने शेतकºयांनी छातीवर दगड ठेवून हिरव्या पिकांवर नांगर फिरविला. तरीही कपाशीवरील बोंडअळीग्रस्त मूर्तिजापूर, लाखपुरी व कुरूम या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. आता मात्र शेतकºयांचे हे शेवटचे पत्र आहे. चुकीचा अहवाल तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना जर मदत पोहोचली नाही तर शेतकरी जो मार्ग अनुसरील व त्यामधून मोठा अनर्थ घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असाही इशारा देण्यात आला आहे.  निवेदनावर प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू साहेबराव वानखडे, कैलास साबळे, मुन्ना नाईकनवरे, प्रा.गौरखेडे, हरनामसिंह बाजहिरे, सुनील काळे, संजय पखाले, मुन्ना पाटील, आनंद खंडारे, संदीप मानकर, संजय गावंडे, रमेश गोळंबे, बी़ पी़ कावरे, प्रभाकर गावंडे, प्रकाश गावंडे, प्रकाश मुळे, देवीदास बांगड,अरूण बोंडे, शरद बंग, बालु टांक, माधव काळे, नितीन गावंडे, श्रीकांत वानखडे, शंकर मोरे आदींच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारामूर्तिजापूर :  मूर्तिजापूर तालुक्यात बोंडअळीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने मदतीसाठी दुजाभाव न करता सरसकट मदत द्यावी,अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा  शिवसेना तालुकाप्रमुख अप्पूदादा तिडके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तालुक्यातील अंतर्गत येणारे मंडळे या मदतीत समाविष्ट करा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अप्पू तिडके, अ‍ॅड. शरद भटकर, वैद्यकीय सेल तालुकाप्रमुख डॉ. पंकज राऊत, शिवा गव्हाणे, रुपेश कडू, मनोज जावरकर, ऋषिकेश देशमुख, रामेश्वर जामनीकर, हेमंत पाटील, ऋषिकेश डिके, मनोज गायकवाड, अंगत पाटील व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Akolaअकोला