शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

वानच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; तेल्हाऱ्यात काढला बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 3:13 PM

हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.

तेल्हारा : तालुक्यातील वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकºयांनी शनिवार, १४ सप्टेंबर तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. आदेश रद्द न केल्यास यापेक्षाही उग्र आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला.शेतकरी बांधवांच्या हक्काचे वाण धरणाचे पाणी अकोला शहरासाठी शासनाने आरक्षित करुण हजारो हेक्टर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील ५४ गावातील वानप्रकल्प लाभ धारक शेतकरी बांधवांनी संतप्त होउन आंदोलनाची दिशा ठरवली. गावागावातिल शेतकºयांनी १० सप्टेंबरला आकोट विधानसभा मतदारसंघ कडकडित बंद केला. यावर शेतकºयांना सहानुभूति न दाखवता आमदार भारसाकळे यांनी वृत्तपत्रातुन शेतकºयांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करून तेल्हारा शहरासत गावांमधील शेतकºयांनी शनिवारी बैलगाडी मोर्र्चा काढला. आठवडी बाजार येथून सुरु झालेला मोर्चा जूने शहर, पोलिस स्टेशन मार्गे टावर चौक ते तहसील कार्यालय येथे धडकला. ‘पाणी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीचे’ या मुख्य नाºयासह पारंपरिक ढोलाच्या भजनातुन नारे देऊन निषेध दर्शविण्यात आला. तसेच ‘गणपती बाप्पा शासनाला बुद्धि दे’ अशा आशयाचे देखावे लक्ष वेधून घेत होती. तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाल्यानंतर उपस्थित हजारो शेतकºयांच्या सह्यांचे निवेदन तेल्हारा तहसिलचे नायब तहसीलदार विजय सुरळकर यांना देण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाने ४० वषार्पूर्वी शेतकर्याच्या विविध मागण्यासंदर्भात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर आज निघालेला भव्य मोर्चा हे त्याची पुनरावृत्ति असल्याचे ज्येष्ट शेत्कयार्नी सांगितले. यावेळी सवार्नुमते पुढील आंदोलनाची दिशा ठरवून १९ सप्टेम्बर पासून तहसील कार्यालयावर साकळी उपोषण व गावोगावत विविध प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला. तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठानेदार विकास देवरे यांच्या मगार्दार्शनात चोख पोलिस बंदोबस्त होता. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी शेतकर्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराFarmerशेतकरीagitationआंदोलन