अकोटः तालुक्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तालुक्यातील प्रिंप्री जैनपूर येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी पोहोचून केळी पिकाच्या विम्याची रक्कम त्वरित खात्यात जमा करावी, अशी मागणी करीत निवेदन दिले आहे.
अकोट तालुक्यातील उमरा मंडळामधील पिंप्री जैनपूर येथील शेतकऱ्यांनी सन २०२० चा केळी विम्याचा भरणा केला होता. परिसरात अस्मानी संकटामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम अद्याप जमा झाली नाही. याबाबत विमा कंपनी प्रतिनिधींसोबत संपर्क केला असता ७२ तासांत आता तुम्ही ई-मेल नाही केला, यामुळे विमा देऊ शकत नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांकडे मोबाइल नाहीत, शेतकऱ्यांनी विमा कंपनीला वारंवार फोन केले, पण फोन उचलले नाहीत. ट्रिगर यंत्रामंध्येसुद्धा झालेल्या नुकसानाची नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, असे ॲग्रिकल्चर विमा कंपनीला आदेश द्यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर मानकर, अमित ढोले, संतोष भगत, प्रवीण बानेरकर, परिक्षित बोचे, प्रशांत भगत, चेतन पखान, भास्कर भगत, तुकाराम मानकर, शंकरराव पखान, गोवर्धन मानकर, रोशन मानकर, संजय जवंजाळ, अनिल मानकर, आत्माराम जवंजाळ आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
नुकसान होऊनही विम्याच्या मदतीपासून अद्यापही वंचित
अकोट तालुक्यातील उमरा मंडळामधील पिंप्री जैनपूर येथील शेतकऱ्यांनी सन २०२० चा केळी विम्याचा भरणा केला होता. परिसरात अस्मानी संकटामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम अद्याप जमा झाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.