मृदा दिनानिमित्त भेंडगाव येथे प्रशिक्षण
पिंजर: जागतिक मृदा दिन कार्यक्रमानिमित्त शनिवारी मौजे भेंडगाव येथे प्रशिक्षण पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कांताबाई आत्माराम पवार तर प्रमुख उपस्थिती उपसरपंच, पोलीस पाटील यांची होती. संचालन मंडळ कृषी अधिकारी पिंजर महादेव राऊत यांनी केले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी केले. यावेळी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक आगे यांनी शेतात जाऊन गहू, हरभरा, तूर पिकांविषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक संदीप थोरात, अक्षय वावकर उपस्थित होते.
मोर्णा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
खानापूर: मोर्णा प्रकल्पाच्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी खानापूर, आस्टुल, पास्टुल, कोठारी, आगीखेड, पार्डी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
परिसरात ५० टक्के गव्हाची लागवड झाली आहे. यंदा हरभऱ्या पेऱ्यात घट झाली आहे. दरवेळी २५ डिसेंबरच्या जवळपास कालव्याला पाणी सोडल्या जाते; परंतु यंदा कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही. कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कपाशीचे पंचनामे करण्याची मागणी
कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम परिसरात मूग, उडीद, सोयाबीननंतर आता बोंडअळीने कपाशी पीक नष्ट झाले आहे. बोंडअळीने हल्ला केल्याने कपाशीचे बोंडे सडली असून शेतकऱ्यांचा खर्च वसूल होणे कठीण झाले आहे. बोंडअळींमुळे उदध्वस्त झालेल्या कपाशी पिकांचे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
सिंचनासाठी दिवसा विद्युत पुरवठा करावा
आलेगाव: ११ केव्ही आलेगाव फिडरवरून परिसरात करण्यात येत असलेला थ्री फेज विद्युत पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करण्यात यावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दिवसा विद्युत पुरवठा केल्यास, पिकांना पाणी देणे सोयीस्कर होईल. रात्रीला पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे.
पुर्नवसित जागेचा आठ ‘अ’ देण्याची मागणी
अंत्री मलकापूर: येथील नागरिकांचे नवीन जागेत तीन वर्षांपूर्वी पुनर्वसन करण्यात आले. परंतु नागरिकांना जागेचा नमुना आठ अ देण्यात आला नाही. येथील रहिवाशांना ग्रामपंचायतने नमुना आठ अ देण्याची मागणी होत आहे. आठ ‘अ’ शिवाय कोणत्याही बॅंकेकडून कर्ज मिळत नाही. ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुरणखेड येथे आदरांजली
कुरणखेड: भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुरणखेड येथील जुनी वस्तीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली. कुरणखेडचे माजी सरपंच गणेश वाघमारे, शहीद विनोद मोहोड स्मारक समितीचे सचिव दिलीप मोहोड, सोसायटीचे अध्यक्ष किरण देशमुख, गौतम मोहोड, राजकुमार जामनिक, विकास मोहोड, मिलिंद मोहोड,पत्रकार योगेश विजयकर, अनिल सिरसाट, राहुल माल्टे यावेळी उपस्थित होते.
फोटो: