अकोला : शेतकरी संघटनेचा पश्चिम विदर्भ युवा संवाद दौरा सोमवार, १ एप्रिल २०१८ पासून दयार्पूर येथून प्रारंभ होत आहे. अकोला जिल्ह्यात २ एप्रिल रोजी कृ. ऊ. बा. स. सभागृह अकोट , दि.३ एप्रिल रोजी सर्किट हाऊस, अकोला, तर ४ एप्रिल रोजी कृ.ऊ. बा.स.सभागृह मूर्तिजापूर येथे युवा कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.आज देशातील साठ प्रतिशत पेक्षा अधीक लोकांचा रोजगार असलेल्या शेती व्यवसायासमोर मोठे प्रश्नचिन्ह प्रचलीत धोरणांनी उभे करून ठेवले आहे. ग्रामीण भारत एका अस्वस्थ वर्तमानाच्या व दिशाहीन भविष्याच्या सावटातून जात आहेत. अशा परिवेशा मध्ये सर्वांना फुलण्याची संधी देणारा शेतकरी संघटना व शरद जोशींचा भारत उत्थान कार्यक्रम हाच काय तो पर्याय म्हणून दिसत आहे. युवकांच्या उत्पादकतेला व उद्योजकतेला वाव मिळाल्याशिवाय समर्थ राष्ट्राचे निर्माण होऊ शकणार नाही. त्या साठी मोकळीक देणारी योग्य धोरणे,संसाधने,संरचना आदींचे निर्माण प्रथम गरजेचा आहे. या उद्देशाने युवा पिढीला जागवण्यासाठी दि.१ एप्रिल २०१८ पासून शेतकरी संघटनेचा पश्चिम विदर्भ युवा संपर्क दौरा आयोजीत करण्यात आले आहे. दयार्पूर,अकोट,अकोला,मूर्तिजापूर,कारंजा लाड,वाशीम,यवतमाळ,चिखली असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.दौºयातील प्रत्येक ठिकाणी युवा कार्यकर्ता बैठक,पदाधिकारी नियुक्त्या,पत्रकार परिषदेतुन शेतकरी संघटनेच्या वर्तमान परिस्थितीवरील भूमिकेची मांडणी व काही ठिकाणी संध्याकाळी एक जाहीर सभा होणार आहे. या दौºयात युवा आघाडी प्र्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, प्रवक्ता शेतकरी संघटना ललीत बहाळे, युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ. निलेश पाटील, जेष्ठ नेते सतीश देशमुख ,सुरेश भाऊ जोगळे, प.विदर्भ शेतकरी संघटना प्रमुख धनंजय मिश्रा, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, अकोट तालुका युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोन्द्रे , तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,तेल्हारा युवा आघाडी प्रमुख निलेश नेमाडे आदींची उपस्थिती राहणार आहे. उत्पादकांच्या न्यायासाठी,उद्योजकतेच्या संधींसाठी, भारत उत्थानासाठी बुद्धिवादी शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने या संपर्क दौºयातील मार्गदर्शनाला उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटने तर्फे करण्यात येत आहे.