लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून ९ सप्टेंबर रोजी सुरू होणारी ‘शेतकरी संवाद यात्रा’ १0, ११ सप्टेंबरला अकोला जिल्ह्यात येत असून, या अराजकीय यात्रेत सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रेचे जिल्हा संयोजक अनिल गावंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी गावंडे बोलत होते. १0 सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता यात्रेचे तेल्हारा तालुक्यात अडसूळ फाटा येथे आगमन होत असून, सकाळी ११.३0 दहीगाव, दुपारी १२.४५ थार, २ वाजता गाडेगाव, २.४५ बेलखेड, ४.४५ चि तलवाडी, ५.४५ ला अडगाव बु., सायंकाळी ७ ला सिरसोली आणि रात्री ९ वाजता अकोट येथे सरपंच संघटना पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहे. ११ स प्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पिंप्री खुर्द, दुपारी १२ बोर्डी, २ वाजता वडगाव मेंढे, २.३0 देऊळगाव, ३ वाजता सावरा आणि दुपारी ४ वाजता आसेगाव बाजार येथे संवाद यात्रा पोहोचणार आहे, अशी माहिती गावंडे यांनी दिली. अनिल गावंडे पुढे म्हणाले, की आम्ही संवाद यात्रेद्वारे विदर्भातील पाच जिल्ह्यांतील किमान ५0 गावांचे आणि गावकरी लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि यात्रा संपल्यावर ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आवारे, पत्रकार सुधाकर खुमकर यांनी शेतकरी संवाद यात्रेत कुणीही हारतुरे आणू नये आणि कोणतेही राजकीय झेंडे घेऊन सामील होऊ नये, असे आवाहन केले. पत्रपरिषदेला गजानन बोरोकार, मनीष भांबुरकर, अशोक घाटे आदी उपस्थित होते.
शेतकरी संवाद यात्रा उद्या पासून तेल्हार्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:33 AM