अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार कायद्याविराेधात असंताेष आहे दिल्लीतही आंदाेलन सुरू आहे अशा स्थितीत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बाेलावून या कायद्यांचा विधीमंडळात विराेध करावा, असे स्पष्ट करत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अर्थात इंटक मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी दिली
साेमवारी आयोजित पत्रकार परिषदेत छाजेड यांनी महाविकास आघाडीचाही या कायद्यांना विराेध असल्याचे सांगितले राज्य सरकारने हा विराेध कायदेशीर मार्गाने नाेंदविण्यासाठी विधी मंडळाचे विशेष अधिवेशनात हे कायदे राज्यात राबविणार नाही, असा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली.
अनेक उद्याेगांमध्ये कामगारांना काढून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. देशातील राज्यकर्त्यांना साेयीच्या काॅर्पाेरेट घराण्यांसाठीचे असे कायदे केले असून, इंटक याविराेधात माेर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले राज्यव्यापी माेर्चात राज्यभरातील इंटकसमवेत सर्व कामगार व शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले प्रदेश इंटकच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींचे संमेलनाचेही आयाेजन केले जाणार असून, त्यामध्ये
अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी एच. के. पाटील, इंटकचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राऊत, अमित देशमुख, आशिष दुवा आदींना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी प्रदेश इंटक नेते मुकेश तिगोटे, प्रदीप वखारिया, महेंद्रसिंग सलुजा, शैलेश सूर्यवंशी, काॅ. देवराव पाटील, काॅ.नयन गायकवाड, सुमंत आवळे, अनिल मावळे, एस. पाटकर, अकिशोर संपळे, शिरसोदे, हसन कादरी, सूरज मेश्राम, पिटके, बी. के. मनवर, संजय राऊत, मेहमूद, इस्माईल, विशाल तायडे, नागेश शेंडे, संदीप मोडक आदी उपस्थित होते.