- संतोषकुमार गवईशिर्ला (अकोला) : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकोला जिल्ह्याचा दौरा केला. म्हैसपूर, कापशी व चिखलगाव येथील शेतकऱ्यांच्या पिक नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या चिखलगाव परिसरातील शेतकºयांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. यामुळे शेतकरी नाराज झाले व त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध करणाºया घोषणा दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री रणजीत पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात हे अकोला-पातुर महामार्गावरील चिखलगाव येथील विनोद थोरात यांच्या शेतात सोयाबीन आणि कापूस संपुर्णपणे भिजला याची पाहणी केली.यावेळी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी पीक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे मुख्यमंत्र्यांना अवगत केले.अवघे चार मिनिटात मुख्यमंत्र्यांनी ह्या शेताची पाहणी केली.मात्र काही शेतकºयांनी त्याना विचारले आम्हाला मदत कधी मिळणार याबाबत त्यांनी एक शब्द ही उच्चारला नाही.यावेळी शेतकरी विजय सोनाजी तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले.त्यात सरसकट नूकसान भरपाई देण्याची मागणी शेतक?्यांनी केली.त्यावर विजय तायडे, मुकेश वहार्डे, नितिन मेतकर, गजानन डोळस, राजाराम यादव, रामेश्र्वर पंडित,अंनंता जाधव, विनोद चव्हाण, आशिष थोरात सचिन खरडे,अनंता सपाट, दादाराव गाडगे, संतोष कोगदे, आकाश केवट यांच्या सह पाचशे नागरिकांच्या सह्या आहेत.मुख्यमंत्री चिखलगाव येथे येत असल्याचे कळताच चिखलगाव,नांदखेड,शिर्ला तथा पातुर तालुक्यातील शेतक?्यांच्या मोठा जमाव येथे जमा झाला.मुख्यमंत्र्यांना भेटुन पीक परिस्थिती अवगत करणार होते मात्र पातुर पोलिसांना जाऊ देण्याचे आदेश नसल्यामुळे शेतकरी नाराज झाले.नाराज झालेल्या शेतकºयांनी मुख्यमंत्री निषेधाच्या घोषणा दिल्या.पातूर पोलिस निरीक्षक जी एम गुल्हाने यांच्या सह पोलीस सहाय्यक आर जी शेख, यांच्या सह पातुर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
मुख्यमंत्र्यांना भेटू न दिल्यानं नाराजी; शेतकऱ्यांची फडणवीसांविरोधात घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 1:41 PM