अकोला : शेती काय असते, शेतीचे प्रश्न कोणते, उत्पादनात होणारा र्हास, शेतीसंबंधीच्या शेकडो प्रश्नांची उकल दस्तूरखुद शेतकर्यांनाच झालेली नसताना केवळ पंधरा मिनिटात नापीक शेतीचा सर्व्हे करणार्या केंद्रीय पथकाला झालेले नुकसान आणि शेतकर्यांच्या व्यथा कशा कळणार कशी, असा उ परोधिक सवाल लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत शेतकर्यांनी उपस्थित केला. यावर्षी राज्यात अवर्षणस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग दोन वर्ष शेतात उत्पादन झाले नसल्याने शेतकर्यांची आर्थिक घडी बिघडली आहे. हातात पैसा नसल्याने त्यांची क्रयशक्ती संपली, अशा अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना थकलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकर्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे. याच सर्व परिस्थि तीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हय़ात येऊन गेले, पण या पथकाने केवळ सतरा मिनिटात आणि तेही रात्रीच्या वेळी शेतीची पाहणी करू न शेतकर्यांची बोळवण केली आहे. आम्हाला देता काय, यापेक्षा आमचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेण्याची फुरसत या पथकाला नव्हती; म्हणजेच या पथकाने शेतकर्यांची थट्टा केली असल्याचा सूर शेतकर्यांमध्ये उमटला. परिचर्चेत अकोला जिल्ह्यातील प्रग तीशिल शेतकरी दादाराव देशमुख, जयप्रकाश मुरमकार, हेमंत देशमुख, कुवरसिंग मोहने, प्रशांत बंड आदी शेतकर्यांनी सहभाग घेतला.
शेतक-यांनाच शेती कळली नाही, पंधरा मिनिटात पथकाला कशी कळणार?
By admin | Published: December 18, 2014 1:01 AM