अकोला : अर्ज दिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सात एकर शेतीची नोंद करण्यात आली नसल्याने, शेतीची नोंद तातडीने करण्याच्या मागणीसाठी चिखलगाव येथील एका शेतकऱ्याने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उघड्यावरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी क्षीरसागर मधुकर वानखडे यांनी सात एकर शेतीची नोंद करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी संबंधित तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्याकडे अर्ज आणि आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली; मात्र अद्यापही शेतीची नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे शेतीची नोंद तातडीने करण्याच्या मागणीसाठी शेतकरी क्षीरसागर मधुकर वानखडे यांनी २० जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शेतीची नोंद करण्यात येत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार असल्याचे शेतकरी क्षीरसागर वानखडे यांनी सांगितले.
.................फोटो......................